मुंबई

ठाण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना; तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही

CD

ठाण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. भटवाडी, किसननगर आणि साकेत परिसरात लागलेल्या या आगींवर ठाणे अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले. या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, १२ मीटर बॉक्स आणि एक एसी युनिट पूर्णपणे जळाले.
पहिली घटना गुरुवारी (ता. २६) रात्रीच्या सुमारास साकेत येथील रुस्तमजी अर्बानिया परिसरात घडली. येथील रुस्तमजी अझेनिया डी विंग या तळ अधिक ४१ मजली इमारतीच्या ५व्या मजल्यावरील एका सदनिकेच्या वातानुकूलित युनिटला किरकोळ आग लागली. त्या आगीवर अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्रीच पूर्णपणे नियंत्रण मिळवले. दुसरी घटना गुरुवारी रात्री १०ः४५च्या सुमारास वागळे इस्टेट परिसरात किसननगर येथे घडली. येथे भीमा शंकर इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर रूममध्ये आग लागली होती. या आगीत एकूण १२ मीटर बॉक्स जळून नुकसान झाले. त्या आगीवर काही मिनिटांत नियंत्रण आणण्यात यश आले.
दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाने जलद कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT