मुंबई

ठाणे @ ३९ अंश - दुपारच्या उन्हाने ठाणेकर हैराण,

CD

दुपारच्या उन्हाने
ठाणेकर हैराण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ ः ठाणे शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून येत आहे. आज दुपारी शहरात तापमान ३९ अंशांवर गेले होते. त्यात रस्त्याने जाताना नागरिकांना उन्हाच्या झळाही सोसाव्या लागत होत्या.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरत होते; मात्र त्यानंतर राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाचा पारा ३० ते ३२ अंशांवर आला; मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. याच कालावधीत उन्हाचा पारा ३५ ते ३९ अंशांवर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात फिरताना उन्हाचे चटके जाणवत आहेत. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक त्रासदायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update: मुंबईमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल...

Railway Police : लोहमार्ग पोलिस दलात राजश्री नाणेकर यांची निवड

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

SCROLL FOR NEXT