मुंबई

नवी मुंबई पोलिसांचा ''हॉटेल अश्वी''वर छापा

CD

नवी मुंबई पोलिसांचा छापा
देहविक्री व्यवसायातून दोन महिलांची सुटका, तीन अटकेत

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : तुर्भे एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश करीत दोन पीडित महिलांची सुटका केली. तसेच या हॉटेलच्या मालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
तुर्भे एमआयडीसीतील ‘हॉटेल अश्वी लॉजिंग अँड बोर्डिंग’मध्ये मालक आणि मॅनेजर ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळून महिलांना वेश्यागमनासाठी उपलब्ध करून देत असल्याचे तसेच आरोपी ग्राहकांना महिलांचे फोटो दाखवून त्यातील एकीची निवड करण्यास सांगत असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बुधवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास अश्वी हॉटेलवर एका बनावट ग्राहकाला पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. या वेळी त्या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी बोलावण्यात आलेल्या दोन पीडित महिला आढळून आल्या. आरोपींनी बनावट ग्राहकाकडून चार हजार रुपये घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी मॅनेजर सुशीलकुमार नरेश शर्मा (३६) आणि वेटर उपेंद्रकुमार घमाडी यादव (२४), छोटनकुमार पेमन यादव (२८) या तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, सिम कार्ड आणि हॉटेलमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला आहे. तुर्भे पोलिस ठाण्यात या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत (ता. २८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT