मुंबई

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

भरधाव कंटेनरच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू

मनोर, ता. २७ ः पालघर-मनोर मार्गावरील सूर्या नदीवरील पुलाजवळ एका धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (ता. २७) घडली असून, याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
पालघर तालुक्यातील प्रकाश नथू धापसी (४०) दुचाकीवरून देवखोपच्या दिशेने जात असताना दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलाजवळील वळणावर भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धापसी हे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास मनोर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update: मुंबईमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल...

Railway Police : लोहमार्ग पोलिस दलात राजश्री नाणेकर यांची निवड

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

SCROLL FOR NEXT