मुंबई

ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह बोगद्याच्या खोदकामाला सुरूवात

CD

ऑरेंज गेट - मरीन ड्राइव्ह बोगद्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्प दाटीवाटीच्या नागरी वस्तीतून जात आहे. या प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचे खोदकाम सुरू आहे.
मुंबईच्या भूमिगत गतिशील जाळे विस्तारीकरणाच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मुंबईच्या किनारी भूभागातील मिश्र व खडतर भूस्तरामध्ये सुरक्षित खोदकाम करण्यासाठी एमएमआरडीएकडून देशातील मोठ्या स्लरी-शिल्ड टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) हे काम केले जात आहे. त्यानुसार बोगद्याच्या मुख्य कामाला सुरुवात झाली असून, काही दिवसांतच ७० मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ डिसेंबर २०२५ला या बोगद्याच्या कामासाठी टीबीएमचे लॉन्चिंग करण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर करून दोन बोगदे उभारले जाणार असून, त्यांची एकूण लांबी जवळपास सात किमी आहे. त्यापैकी सध्या सुरू असलेला पहिला बोगदा ३.४५ किमी लांबीचा असून, त्याची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून कमाल ५२ मीटर असणार आहे.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT