मुंबई

मुंबईतील भूजल व्यवस्थापन, नियोजन गरजेचे

CD

भूजल व्यवस्थापन, नियोजन गरजेचे
केंद्रीय भूजलविषयक वैज्ञानिकांच्या कार्यशाळेतील मत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : पाण्याचे नैसर्गिक स्रोत, भूगर्भातील पाण्याचा साठा, भविष्यासाठी त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन यावर पालिका मुख्यालयात शुक्रवारी (ता. २७) बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय अधीनस्थ केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी भूजलाची माहिती दिली.

मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक असून, भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात आणवा तसेच प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. मुंबईचे अनेक भाग हे समुद्रकिनारी असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका असल्याकडेही धोंडे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, या बैठकीत भूजलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तिचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत महापालिका उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे, उप मुख्य अभियंता अजय राणे यांच्यासह भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग आदींच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे आदी या वेळी उपस्थित होते.
-----------
देशभरात जमिनीखालील पाण्याचे साठे कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा, याबाबत धोंडे यांनी माहिती दिली. मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात आणणे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे तसेच मुंबईचा मोठा भाग हा समुद्रकिनारी असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका असल्याकडेही भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT