मुंबई

पाच पोलिसांची निर्दोष मुक्तता

CD

पाच पोलिसांची निर्दोष मुक्तता
कथित बनावट चकमक प्रकरण; कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईतील एका हॉटेलमध्ये दशकभरापूर्वी गँगस्टर संवरदीप गडौलीच्या कथित बनावट चकमकीप्रकरणी हरियाना पोलिस दलातील पाच कर्मचाऱ्यांची कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी (ता. २७) निर्दोष मुक्तता केली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत काळे यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि इतर संबंधित तरतुदींखालील आरोपांतून पाचही पोलिसांची निर्दोष मुक्तता केली. अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलमध्ये ७ फेब्रुवारी २०१६मध्ये गुरुग्राम पोलिसांनी केलेल्या कथित गोळीबारात गडौली मारला गेला. या कुख्यात गँगस्टरवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते तसेच १९९९ पासून त्याच्याविरोधात ४० हून अधिक गुन्हे दाखल होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी, गडौलीची प्रेयसी (मृत दिव्या पाहुजा), तिची आई आणि प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या वीरेंद्र गुर्जरचा समावेश होता. आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये प्रद्युम्न यादव (तत्कालीन उपनिरीक्षक), विक्रम सिंग, जितेंद्र यादव, दीपक काकरान आणि परमजीत अहलावत यांचा समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पाहुजाच्या मदतीने गडौलीला जाळ्यात ओढण्यात आले होते आणि एका बनावट चकमकीत त्याची हत्या करण्यात आली होती. गडौली प्रकरणात जामिनावर असतानाच २०२४मध्ये हरियानातील एका हॉटेलमध्ये दिव्या पाहुजाची हत्या करण्यात आली. त्यानंतर पाहुजाविरुद्धचा खटला संपुष्टात आणण्यात आला.


बचावासाठी खोटे पुरावे
गडौलीशी पूर्ववैमनस्य असलेल्या गुर्जरनेच मुंबईतील हॉटेलमध्ये कथित चकमकीचे संचालन केले होते. आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये बेकायदा शस्त्रांचा वापर करून गडौलीवर गोळीबार केला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटे पुरावे सादर केले, हे सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने ४३ साक्षीदारांचे जबाब आणि विस्तृत तांत्रिक पुरावे (सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि बॅलेस्टिक्स अहवाल) न्यायालयासमोर सादर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

Pune News: हॉटेल मालकांनो सावधान! गॅस टंचाईच्या नावाखाली जादा पैसे घेणं पडणार महागात; 'सीसीपीए'ने काढला कारवाईचा बडगा.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

SCROLL FOR NEXT