मुंबई

वीटभट्ट्यांच्या धुरात हरवले बालपण

CD

वीटभट्ट्यांच्या धुरात हरवले बालपण
स्थलांतरित मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित
कासा, ता.२८(बातमीदार)ः वीटभट्टी, बांधकाम क्षेत्रांवर मोलमजुरीसाठी अनेक आदिवासी कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. वर्षातील आठ ते दहा महिने उदरनिर्वाहासाठी शहरामध्ये राहावे लागत असल्याने वीटभट्ट्यांच्या धुरातच मुलांचे बालपण हरवल्याचे चित्र आहे.
डहाणू तालुक्यातील कासा, वरोती, सायवन, निंबापूर ग्रामीण, आदिवासी भागांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतर करतात. रोजगाराच्या संधींचा अभाव, पाणीटंचाई तसेच गरिबीमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना वीटभट्ट्या किंवा बांधकामाच्या ठिकाणी राहावे लागते. परिणामी, अनेक मुलांचा शाळेशी संपर्क तुटतो. शिक्षण खंडित होणे, मुलांसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. काही मुले वर्षातून काही महिने शाळेत, तर उर्वरित काळ मजुरीच्या ठिकाणी राहतात. त्यामुळे अभ्यासाची आवड नसणे, कुपोषण, आरोग्य समस्या, बालमजुरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
-----------------------------------
तज्ज्ञांच्या मते
स्थलांतरित मुलांसाठी स्वतंत्र शिक्षणव्यवस्था उभी करण्याची मागणी केली आहे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने काही योजना राबवल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे स्थलांतरित मुलांसाठी ‘चलत शाळा’ (मोबाइल स्कूल), हंगामी वसतिगृहे, गावपातळीवर रोजगारनिर्मितीची गरज आहे. त्याचबरोबर पालकांसाठी व्यसनमुक्ती मोहिमा, शिक्षणाबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.
---------------------------
दरवर्षी वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतो. त्यांनी शिक्षण घ्यावा, यासाठी आमचे प्रयत्न असतात. पण गरिबी, अनेक इतर गोष्टीमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे ठोस उपाययोजनाची आवश्यकता आहे.
- संजय सावकारे, शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT