रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट वेंडिंग मशीन
पालघर (बातमीदार) ः पालघर पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना पश्चिमेला रेल्वे तिकिटासाठी जावे लागत होते. त्यामुळे पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात तिकीट खिडकी रेल्वेने सुरू करावी. तसेच तिकीट वेंडिंग मशीन सुरू करावे. यासाठी प्रवासी रेल्वे संघटनेने रेल्वे अधिकाऱ्यांना अर्ज दिला होता. अखेर रेल्वेचे मंडल वाणिज्य निरीक्षक किशोर नाहकानी यांनी तिकीट वेंडिंग मशीन सुरू केले आहे.