मुंबई

जव्हार रुग्णालयात डायलिसिसची सुविधा

CD

जव्हार रुग्णालयात डायलिसिसची सुविधा

जव्हार, ता. २८ (बातमीदार) ः परिसरातील रुग्णांना दर्जेदार, सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सुविधेमुळे स्थानिक रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जव्हार तसेच परिसरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात डायलिसिस सेवा उपलब्ध होणे गरजेचे झाले होते. याच अनुंषगाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. संजय कावळे, जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा उदवंत तसेच नगरसेविका मनीषा वड, पूजा खोरगडे, रुचिका वझे यांची प्रमुख उपस्थिती होती. या केंद्रामुळे जव्हार भागातील मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT