मुंबई

उंच इमारतींच्या सुरक्षेसाठी पालिका सज्ज

CD

उंच इमारतींच्या सुरक्षेसाठी सज्जता
महापालिकेच्या ताफ्यात येणार ७० मीटरची हायड्रोलिक शिडी

कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाढत असलेल्या उंच इमारतींची संख्या लक्षात घेता, आग नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागात लवकरच ७० मीटर उंचीची अत्याधुनिक हायड्रोलिक शिडी दाखल होणार आहे. शुक्रवारी (ता. २७) पार पडलेल्या महासभेत अग्निशमन विभागप्रमुख नामदेव चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

दीड वर्षांपूर्वी ‘वर्टेक्स’ या १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या वेळी पालिकेची ५५ मीटरची शिडी तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे समोर आले होते. यावरून शिंदे सेनेच्या नगरसेविका शालिनी वायले यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर स्पष्टीकरण देताना चौधरी यांनी सांगितले, की ही शिडी जपानी कंपनीची असून तिचे सुटे भाग मागवण्यात आले आहेत. लवकरच कंपनीचे तंत्रज्ञ येऊन ही शिडी कार्यान्वित करतील.

शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांबाबत माहिती देताना चौधरी म्हणाले, की रुणवाल बिल्डरकडून विकसित केल्या जाणाऱ्या टाऊनशिपमध्ये स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. संबंधित बिल्डरकडून ९० मीटर उंचीची शिडी घेतली जाणार असून, पुढील पाच वर्षे या केंद्राचा खर्च बिल्डरच उचलणार आहे. याचा फायदा २७ गावे आणि शहरी भागाला होईल.

सोसायट्यांना फायर ऑडिटची सक्ती
आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले, की आग विझवण्यासोबतच ती लागू नये, याची काळजी घेणे ही सोसायट्यांचीही जबाबदारी आहे. पालिकेने यासाठी एसओपी (SOP) तयार केली असून, सर्व सोसायट्यांना इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करणे आता अनिवार्य असणार आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी
अग्निशमन दलात १५० पदे रिक्त असून केवळ ३८ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. ही पदे तातडीने भरण्याची मागणी नगरसेवकांनी केली. पालिकेच्या हद्दीत आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही; मात्र हद्दीबाहेर पाच ते १० किमी अंतरासाठी ५,१०० ते १०,२०० रुपये शुल्क आकारले जाते.

उत्पन्नवाढीच्या सूचना
औद्योगिक कारखान्यांची आग विझवण्यासाठी अधिक शुल्क आकारल्यास पालिकेचे उत्पन्न वाढू शकते, अशी सूचना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली, तर बाहेरील शुल्कात वाढ करण्याची मागणी मंदार हळबे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT