मुंबई

शेती मालाचे दर कोसळले

CD

शेतीमालाचे भाव कोसळले
कल्याण बाजार समितीत मागणी घटली; इंधन टंचाईचा दुहेरी फटका
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र त्या तुलनेत होलसेल आणि किरकोळ खरेदीदारांची कमतरता असल्याने शेतमालाचे दर कमालीचे कोसळले आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात विस्कळित होऊन तो माल स्थानिक बाजारपेठेत वळल्याने पुरवठा जास्त आणि मागणी कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

गॅस आणि इंधनाच्या टंचाईमुळे मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी आपले व्यवहार मर्यादित ठेवले आहेत. तर व्यावसायिक सिलिंडर मिळवताना होणाऱ्या अडचणींमुळे छोटे हॉटेलचालक आणि हातगाडीवाले हतबल झाले आहेत. याचा थेट परिणाम बाजार समितीतील खरेदीवर झाला असून, व्यापारी जास्त माल उचलण्यास धजावत नाहीत.

ऐन उन्हाळ्यात शेतमालाचे भाव कोसळल्याने उत्पादनाचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. निर्यात कधी सुरळीत होणार याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे स्थानिक शेतकरी गणेश म्हात्रे यांनी म्हटले आहे. तर मागणीच्या तुलनेत आवक प्रचंड वाढल्याने दरांवर परिणाम झाला आहे. निर्यातीचा माल स्थानिक बाजारपेठेत आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय एडगे यांनी दिली. वाढत्या आवकमुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या आर्थिक संकटात सापडले असल्याचे चित्र कल्याण बाजार समितीत पाहायला मिळत आहे.

आकडेवारी
भाजीपाला : ७५ गाड्यांतून सुमारे ३,२९७ क्विंटल आवक
कांदा-बटाटा-लसूण : २८ गाड्यांतून ४,२१० क्विंटल आवक
फळे व फुले : फळांची ४७ गाड्यांतून ९७५ क्विंटल, तर फुलांची ३२० क्विंटल आवक
पालेभाज्या : १९ गाड्यांतून ३८० क्विंटल आवक

बाजारभाव (प्रति नग)
कोथिंबीर : १० ते २० रुपये
मेथी : १० ते १४ रुपये
पालक : १० ते १४ रुपये

फळभाज्या (प्रति क्विंटल)
तोंडली : ३,६००-४,४०० रुपये
आले : ३,०००-५,००० रुपये

फळे (प्रति किलो)
द्राक्षे : ६०-८० रुपये
संत्री : ५०-७० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT