मच्छीमार सोसायट्यांचे संसदेत गाऱ्हाणे
पालघर, ता. २८ ः राज्यातील मत्स्य सहकारी संस्थांना घाऊक ग्राहक श्रेणीत ठेवल्याने महागडे डिझेल खरेदीची वेळ आली आहे. त्यामुळे मत्स्य सहकार क्षेत्र संकटात सापडल्याने खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी थेट संसदेतच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्रातील मच्छीमार सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा खासदार डॉ. सवरा यांनी सभागृहात वाचला. मच्छीमार सोसायट्यांना ‘बल्क कन्झ्युमर’ श्रेणीत टाकल्यामुळे ११३ रुपये प्रति लिटर दराने डिझेल घ्यावे लागत आहे. तर दुसरीकडे बाजारात डिझेलचा किरकोळ दर अंदाजे ८७ रुपये प्रति लिटर आहे. या फरकामुळे लहान, पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे डॉ. सवरा यांनी सांगितले. तसेच मच्छीमार राज्य सरकारच्या निर्धारित डिझेल कोटा प्रणालीअंतर्गत सहकारी संस्थांच्या माध्यमातून डिझेल मिळवतात. इंधन पुरवठादार कंपन्या संस्थांना डिझेलचा पुरवठा करतात. या सहकारी संस्था सामान्य मच्छीमारांचे प्रतिनिधित्व करतात, असे डॉ. सवरा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.