मुंबई

केडीएमसी क्षेत्रात रविवारी ''नवभारत साक्षरता अभियान''

CD

पालिका क्षेत्रात आज ''नवभारत साक्षरता'' परीक्षा
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : भारत सरकारच्या ''नवभारत साक्षरता अभियान'' अंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागातर्फे रविवारी (ता. २९) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील असाक्षरांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

२०२५-२६ या वर्षासाठी महापालिकेने २००० साक्षरांचे उद्दिष्ट ठेवले होते. शिक्षण विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आतापर्यंत १७८१ व्यक्तींची नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थींमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. एकूण परीक्षार्थींपैकी १५२५ महिला आणि २५६ पुरुष उद्या ही परीक्षा देणार आहेत. महिलांचा हा सहभाग स्त्री साक्षरतेच्या दृष्टीने अत्यंत उत्साहवर्धक मानला जात आहे. शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली. "केवळ अक्षरांची ओळख करून देणे हा या अभियानाचा मर्यादित हेतू नाही. नागरिकांना दैनंदिन जीवनातील मूलभूत संख्याज्ञान आणि व्यवहार ज्ञान मिळावे, जेणेकरून ते स्वावलंबी होतील, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासन सज्ज
उद्या होणाऱ्या या मूल्यमापन चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी केडीएमसीचा शिक्षण विभाग, शिक्षक आणि स्वयंसेवक पूर्णतः सज्ज झाले आहेत. शहरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त असाक्षर नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे कल्याण-डोंबिवली शहराच्या साक्षरतेच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT