काटेमानिवली उड्डाणपुलावर रिक्षा-कारची धडक
कल्याण, ता. २९ (बातमीदार) : पूर्व भागातील रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्व. प्रल्हाद शिंदे (काटेमानिवली) उड्डाणपुलावर शुक्रवारी (ता. २७) रात्री भीषण अपघात झाला. भरधाव येणारी एक कार आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ कमी असताना ही दोन्ही वाहने परस्परविरोधी दिशेने जात होती. यांची धडक इतकी भीषण होती, की तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि इतर वाहनधारकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातात दोन्ही वाहनांचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. जखमी रिक्षाचालकाला नागरिकांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, उड्डाणपुलावरील सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी या पुलावर वाहनांचा वेग अनियंत्रित असतो. यामुळे छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. स्थानिक राजकीय वर्तुळातूनही या घटनेची दखल घेतली जात असून, पुलावर दिशादर्शक फलक आणि वेगमर्यादेचे नियम कडक करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांची मागणी
काटेमानिवली उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी होणारी बेदरकार वाहतूक रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या उड्डाणपुलावर अपघात रोखण्यासाठी रंबलर्स किंवा सीसीटीव्ही बसवण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.