मुंबई

मिरा-भाईंदर पालिकेची कसरत

CD

मिरा-भाईंदर पालिकेची कसरत
महसुली उत्पन्नात शंभर कोटींची तूट, विकासकामांवर परिणामांची भीती

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अपेक्षित उत्पन्नात शंभर कोटींची महसुली तूट येणार आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात वसुलीच्या आकडेवारीनुसार विविध विकासकामे हाती घेण्याची वेळ पालिकेवर येणार आहे.
२०२५-२६ आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने १,२१६ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा धरली होती; परंतु वर्षअखेरीस पालिकेच्या तिजोरीत १,१०० कोटींचे उत्पन्न जमा होणार असल्याची अपेक्षा आहे. त्यामुळे १०० कोटींहून अधिक रुपयांची महसुली तूट होणार आहे. मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतांपैकी महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ३८१ कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी प्रशासनाची अपेक्षा होती; मात्र मार्चअखेर करापोटी ३१२ कोटी रुपये उत्पन्न मिळणार असल्याने उत्पन्न ६० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. शहरात होणाऱ्या इमारत बांधकामांसाठी नगररचना विभागाला विकास कर मिळत असतो. मालमत्ता करापाठोपाठ विकास करातूनही पालिकेला चांगले उत्पन्न मिळत असते. चालू आर्थिक वर्षात नगररचना विभागाकडून २२० कोटींचा महसूल जमा होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र १९२ कोटी रुपयेच तिजोरीत जमा होणार आहेत. त्यामुले अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही.
----------------------------
उत्पन्नवाढीचे आव्हान
- शहरातील अतिक्रमणांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. या कारवाईच्या बदल्यात दंड वसूल केला जातो. यापोटी १२ कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात वर्षअखेरीस तिजोरीत एक कोटी रुपये जमा होणार आहेत.
- जाहिरात विभागाकडून १४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात ९.५ कोटी, परवाना शुल्काच्या बदल्यात ४.५ कोटी मिळतील, असे गृहीत धरण्यात आले होते; मात्र वर्षांच्या शेवटी २.५ कोटी रुपयेच वसूल होणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
--------------------------
महापालिका प्रशासनाने उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच करवसुलीवर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला दर तीन महिन्यांचे वसुलीचे उद्दिष्ट नक्की करण्यात येणार आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT