मुंबई

अर्थसंकल्प महासभा : पारदर्शकतेचा नवा आदर्श अन्‌‍ विकासाचा पाटील पॅटर्न

CD

पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
महापौरांचा अर्थसंकल्पीय भाषणात विकासाचा नवा पॅटर्न

विरार, ता. २८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेची अर्थसंकल्पावरील विशेष महासभा बुधवारी (ता. २५) पार पडली. या सभेत महापौर अजीव पाटील यांनी अनेक सूचना मांडल्या. अजीव पाटील यांनी या अर्थसंकल्पीय भाषणात सामान्य वसई-विरारकरांच्या रोजच्या जगण्याशी निगडित प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शहराच्या विकासासाठी केवळ निधी खर्च करणे पुरेसे नसून, पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाने मांडलेली ‘रिव्हर्स बिडिंग’ची संकल्पना त्यांनी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींसमोर मांडली.

महापौरांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने पालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर दिला. शहरात मालमत्ता कराच्या नोंदी वाढल्या असून, त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या अमृत सरोवर आणि तलाव संवर्धन यासारख्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त अनुदान खेचून आणण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे, अशी सूचना त्यांनी केली. नगररचना विभागाला निर्देश देताना त्यांनी स्पष्ट केले, की नवीन इमारतींमध्ये बिल्डरांकडून बसवल्या जाणाऱ्या एसटीपी आणि फायर लिफ्टच्या देखभालीचा खर्च भविष्यात रहिवाशांवर पडू नये, यासाठी विकसकांकडून किमान पाच वर्षांचा देखभाल करार करणे बंधनकारक करावे. आरोग्य व्यवस्थेवर बोलताना त्यांनी नाममात्र शुल्क आकारून केसपेपर काढण्याची सूचना केली, जेणेकरून सुविधेचा गैरवापर थांबेल आणि गरिबांना नगरसेवकांच्या शिफारशीने मोफत उपचार मिळतील. याशिवाय एकल महिलांना मालमत्ता करात सवलत देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्पुरता निवारा केंद्र उभारणे आणि दिव्यांग मुलांसाठी विरारमध्ये ईटीसी सेंटर व सायन्स पार्क सुरू करण्यासारख्या अत्यंत संवेदनशील आणि आश्वासक सूचना त्यांनी मांडल्या.
अग्निशमन दलाच्या ताफ्यातील जुन्या झालेल्या गाड्या बदलण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचे सांगतानाच शहराच्या पाणीप्रश्नावर खडकोली धरणाची दुरुस्ती हा महत्त्वाचा पर्याय त्यांनी सुचविला. भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्यापासून ते पालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण बदलांपर्यंत त्यांनी अनेक पैलूंवर चर्चा केली. प्रशासकीय खर्चात कपात आणि उत्पन्नात वाढ हे सूत्र त्यांनी पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडेल, असा विश्वासही व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT