मुंबई

वसई-विरारकरांसाठी बहुजन विकास आघाडीची मोठी भेट

CD

पाण्याच्या निचऱ्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर
वसई-विरारकरांसाठी बहुजन विकास आघाडीची मोठी भेट

विरार, ता. २९ (बातमीदार) : वसई-विरार शहरातील सुमारे २५ लाख नागरिकांच्या सेवेसाठी पालिकेतील बहुजन विकास आघाडी सरकारने एक मोठी भेट दिली आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या आदेशाने शहरातील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्याला महापालिकेने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, गटार व पाण्याच्या निचऱ्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीतील तब्बल २२२ कोटी ८३ लाख ९८ हजार ९५३ रुपये खर्चाच्या २६३ विकासकामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. यातून पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. वसई-विरार हा भूप्रदेश अति पर्जन्यशील क्षेत्रात येत असल्याने येथे दरवर्षी पावसाळ्यात सुमारे तीन हजार मिलीमीटर ते तीन हजार ५०० मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद होते. या अतिवृष्टीमुळे महापालिका कार्यक्षेत्रात पूरस्थिती निर्माण होते. रस्त्यालगत योग्य गटारे नसल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते आणि पाण्याचा निचरा वेळेत न झाल्याने नागरिकांना वाहतुकीच्या व दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेत बविआच्या वतीने यावर तोडगा काढण्याचा निर्धार केला आहे.
साचलेल्या पाण्याचा सुयोग्य निचरा होण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने गटार, नाल्यांचे बाधकाम करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने महापालिकेच्या प्रभात ए ते आय अंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये आरसीसी आणि पाईप गटारे नव्याने बांधणे तसेच दुरुस्ती करण्याच्या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देत, ई-निविदा कार्यप्रणालीद्वारे निविदा मागवण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. यात एकूण २६३ विविध ठिकाणांची ही कामे मार्गी लागल्याने शहराच्या कानाकोपऱ्यातील पाणी साचण्याची समस्या कायमची निकाली निघेल, असा ठाम विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य जनतेला नेहमीच केंद्रस्थानी ठेवून बहुजन विकास आघाडीने आजवर शहराचा विकास साधला असून, भविष्यातही या परंपरेला कोणताही अपवाद नसेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. रखडलेली आणि प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करून वसई-विरारकरांना दिलासा देण्यासाठी पक्ष पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

"म्हणून वेगळ्या भूमिका साकारण्याकडे कल" प्रियाने स्पष्ट केलं हटके भूमिका साकारण्यामागचं खरं कारण !

SCROLL FOR NEXT