मुंबई

पालिकेकडून खारघर मधील अनधिकृत आइस्क्रीम वाहनावर कारवाई

CD

खारघरमधील अनधिकृत आइस्क्रीम वाहनावर कारवाई
पालिकेकडून सहा गाड्या जप्त
खारघर, ता. २८ (बातमीदार) : खारघर परिसरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये अनधिकृतपणे आईस्क्रीम आणि फालुदा विक्री करणाऱ्या वाहनांवर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर कारवाई केली आहे. या कारवाईत सहा आईस्क्रीम वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खारघर परिसरातील मुख्य चौकासह शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत आईस्क्रीम वाहनांची संख्या झपाट्याने वाढली होती. आईस्क्रीम विक्रेते थेट रस्त्यावर गाडी उभी करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत होता. तर, ग्राहक आईस्क्रीम खाण्यासाठी पदपथ व रस्त्यांवरच वाहने उभी करत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. २४) आइस्क्रीम वाहनांचा सुळसुळाट पालिका आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अशी बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने खारघरमधील अनधिकृत आईस्क्रीम-फालुदा विक्री वाहनावर कारवाई करत सहा वाहने जप्त केली आहेत.

खाद्य विक्रेत्यांवर कारवाई करून साहित्य जप्त
खारघर परिसरात अस्वच्छ जागी खाद्यपदार्थांच्या विक्रीमुळे आरोग्याला धोका होत असल्याने पालिकेचे दुर्लक्ष अशी बातमी १७ मार्च रोजी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार शिल्प चौक, मुर्बीगाव सर्कल आणि इतर अस्वच्छ ठिकाणी सुरु असलेल्या खाद्यविक्रेत्यांवर कारवाई करून साहित्य जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT