मुंबई

भोंदूबाबा अशोक खरात याचा निषेध

CD

भोंदूबाबा अशोक खरात याचा निषेध
नेरूळ, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबईतील विविध सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे शुक्रवारी (ता. २७) भोंदूबाबा अशोक खरात याचा निषेध केला आहे. जादूटोणाविरोधी कायद्याचा समाजात प्रचार व प्रसार करून, विवेकी समाज निर्माण करू या, हा संदेश या निषेध सभेत देण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाण्यांत अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच जादूटोणाविरोधी कायद्याची नियमावली लवकरात लवकर बनवावी, जेणेकरून अशोक खरातसारख्या भोंदूबाबांना अटक आणि शिक्षा होईल, असे मत संघटनांनी या वेळी मांडले.
या सभेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्त्रीमुक्ती संघटना, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, नवी मुंबई म्युझिक ॲण्ड ड्रामा सर्कल, बावीस प्रतिज्ञा अभियान, प्रतिष्ठा सोशल फोरम, वूमन वेलफेअर फोरम, मातृ सेवा सहकारी संस्था, विश्वभूषण ज्ञान सुविधा प्रतिष्ठान, संघर्ष खारघर दारूमुक्ती संघटना आदी सहभागी झाल्या होत्या. नंदकिशोर तळाशीलकर, प्रा. रवींद्र खानविलकर, मनोहर तांडेल, चंद्रकांत सर्वगौड, अरविंद सोनटक्के, प्रदीप कासुर्डे, नीता डुबे, वृषाली मगदूम, वासंती भगत, कल्पना शिंदे, शकुंतला काळे, अमरजा चव्हाण, कल्पना गोसावी, डॉ. प्रतिभाराजे गायकवाड, पुष्पा सावंत, महेंद्र पवार, मधुकर राऊळ, प्रकाश पाटील, गजानंद जाधव, किरण वाळुंज, जितेंद्र बनसोडे, निवास पडळकर, डॉ. अजित मगदूम, ॲड. निवेदिता सावंत, शेवंती दांगट, शशिकांत पवार, कमांडर कलावत, रमेश मेनन, कीर्ती मेहेरा, चंद्रकांत पवार, वसंत वाघमारे, सीमा कांबळे, वसंत गायकवाड, अलका तुळसे, रमेश अहिरे, कमेश कांबळे, गौतम मोरे, अशोक शिंदे, रमेश नडगम, जगन्नाथ साबळे, वामन गोरडे, वंदना अंभोरे, संतोष पावस्कर, कैलास मोहिते, अर्जुन पाटील, महेंद्र पवार, पुष्पा शेट्टी, ज्ञानेश्वर महाजन, अप्पा होळ, अजय भोसले, विनोद धुरंधर, अशोक निकम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT