मुंबई

हरवलेला तरुण पुन्हा कुटुंबाच्या कुशीत

CD

ठाणे शहर, ता. २८ (बातमीदार) : मुंबईत हरवलेल्या बिहारमधील एका तरुणाला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रशासनाने मोठ्या प्रयत्नांतून त्याच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. पोलिसांना तो मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात आढळला होता. पोलिसांनी त्याला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. चार महिन्यांपासून हा तरुण रुग्णालयात मानसिक आरोग्य उपचार घेत होता. उपचारादरम्यान त्याची मानसिक स्थिती सुधारत असताना त्याच्याकडून कुटुंबाबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता.
चार महिन्यांपूर्वी मानसिक अवस्था बिघडलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणावर उपचार करता करता त्याच्याकडून बिहारात राहत असलेल्या कुटुंबाचा पत्ता शोधून काढला. मात्र त्याचे कुटुंब तेथूनही दिल्लीला राहायला गेले होते. त्यानंतरही हार न मानता प्रशासनाने दिल्लीतील पत्ताही शोधून काढला. १३ जानेवारीला व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांची ओळख पटवून घेतली. काही दिवस उपचार करून तरुणाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला नुकतेच कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत उपअधीक्षिका डॉ. प्राची चिवटे, वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशीष पाठक, डॉ. मनोज भिसे, नितीन शिवदे, मेट्रन माधुरी कांबळे, परिचारिका स्मिता राणे, रूपाली भगत, समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ; तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

मनोरुग्णांचे आधारवड
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय मानसिक आरोग्य बिघडलेल्या रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना बरे केले जाते. मात्र, अनेक रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांकडून घरी घेऊन जाण्यास टाळाटाळ केली जाते. बेवारस रुग्णांची अवस्था तर खूपच दयनीय असते. या रुग्णांना घराचा पत्ता व्यवस्थित सांगता येत नसल्याने घरी पोहचवण्याची कसरत रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना करावी लागते.


मानसिक आरोग्य उपचारात वैद्यकीय सेवेसोबत पुनर्वसनही तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंबाची भूमिका खूप मोलाची आहे. त्यांच्या प्रेमातूनही रुग्ण लवकर बरा होण्यास मदत मिळते. त्यामुळे कुटुंबाने जबाबदारी झटकता कामा नये.
- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

ठाणे : मरिन ड्राईव्ह येथे सापडलेल्या मनोरुग्णाला प्रकृती स्थिर झाल्यानंतर कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT