मुंबई

डिजिटल बस पास सक्तीविरोधात ज्येष्ठांमध्ये नाराजी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे महापालिकेमार्फत टीएमटी बस प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल बस पास काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ही प्रक्रिया खर्चिक व त्रासदायक आहे. ज्येष्ठांना सवलत देण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या डिजिटल बस पासऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरावे, अशी मागणी ठाणे जिल्हा पेन्शनर असोसिएशनने पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आधार कार्डमध्ये नागरिकाची सर्व आवश्यक माहिती उपलब्ध असते. त्यामुळे नवीन डिजिटल पास काढण्याची सक्ती करण्यामागे कोणतेही ठोस कारण नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक व मानसिक ताण येत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. डिजिटल बस पाससाठी दरवर्षी ७७ रुपये शुल्क आकारले जात असून, पास मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. विशेषतः उन्हाळ्यात तासन् तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ज्येष्ठांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिरीष नागले यांनी याबाबत ठाणे पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. डिजिटल बस पासची सक्ती तत्काळ रद्द करून आधार कार्डालाच वैध ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

Gautala Ghat accident news: गौताळा घाटात ऊसतोड मजुरांचा टेम्पो दरीत कोसळला; १३ जखमी, ७ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT