मुंबई

ठाणे अवतीभवती

CD

मांजरीच्या पिल्लाची सुटका
ठाणे : चंदनवाडी परिसरातील नाल्यात अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची ठाणे महापालिका अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुटका केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.२० वाजता घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. शहीद उद्यानासमोरील शिवदर्शन इमारतीमागील नाल्यात मांजरीचे पिल्लू अडकल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पथकाने तत्परतेने बचावकार्य करत पिल्लाची सुखरूप सुटका केली.
..........

मुरबाड येथे पालखी सोहळा
मुरबाड (बातमीदार) : नढई येथील श्री हनुमान मंदिराच्या प्रतिष्ठापना दिनानिमित्त शनिवारी भव्य पालखी सोहळा पार पडला. मंदिराचा ७९वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मोहन जोशी व त्यांच्या परिवाराने केले. सकाळी आठ वाजता हनुमान उत्सव मूर्तीची पूजा करून रुद्राभिषेक घालण्यात आला. भजन आणि आरती झाल्यानंतर सकाळी १० वाजता ढोल-ताशांच्या गजरात उत्सव मूर्तीची भव्य पालखी मिरवणूक डॉ. अच्युत ऊर्फ बाळ जोशी यांच्या निवासस्थानापासून मुरबाड एसटी स्थानकापर्यंत काढण्यात आली. नढई, शिरोसेपाडा व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

झाड कोसळल्याने तीन कारचे नुकसान
ठाणे : वृंदावन सोसायटी परिसरातील साई तुलसी सोसायटीच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी एक मोठे झाड अचानक कोसळल्याने तीन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाड कोसळल्याची माहिती सायंकाळी ६.२६ च्या सुमारास मिळाली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने झाड कापून बाजूला केले व परिसर सुरक्षित केला. दरम्यान, झाड कोसळल्यामुळे दोन कारचे नुकसान झाल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT