मुंबई

पालखी सोहळ्याने गाव भक्तिमय

CD

मुरबाड, ता. २८ (वार्ताहर) : तालुक्यातील उंबरपाडा (सरळगाव) येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात करण्यात आले होते. समाधीस्थ परमपूज्य योगी रिद्धीनाथ महाराज (टाकेश्वर मठ), योगी रामनाथ महाराज (संगमेश्वर मठ); तसेच मंथ योगी फुलनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने सकाळी ९ ते १२ या वेळेत श्रीराम जन्मोत्सव, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
हनुमान मंदिरापासून पालखी सोहळ्याची सुरुवात होऊन संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील प्रत्येक घरासमोर गुढी उभारण्यात आली होती. तसेच भगिनीवर्गाने घरोघरी पालखीचे स्वागत करून पूजा केली. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला योगी यशनाथ महाराज (टाकेश्वर मठ) व योगी गोपीनाथ महाराज (संगमेश्वर मठ) उपस्थित होते. योगी यशनाथ महाराज यांनी प्रवचनातून श्रीराम जन्माचे महत्त्व व आध्यात्मिक संदेश उपस्थितांना समजावून सांगितला.
या वेळी मुरबाड तालुक्यातील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार तसेच गायक-वादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनामाच्या गजरात वातावरण भारावून गेले होते. दरम्यान, ह.भ.प. श्री हिरू घुडे (सेवानिवृत्त, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक) यांच्या निवासस्थानीही रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT