मुंबई

फळ आणि भाजीपाला आवारातील अनधिकृत व्यापार रडारवर

CD

बाजार समिती परिसरातील अनधिकृत व्यापार रडारवर
सचिवांचे कडक कारवाईचे निर्देश
जुईनगर, ता. २९ (बातमीदार) : कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ आणि भाजीपाला बाजार परिसरात अनधिकृत व्यापार वाढत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहे. यामुळे शेतकरी आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून चिंता व्यक्त केली जात आहे. विविध सामाजिक आणि व्यापारी संघटनांनी याविरोधात आवाज उठवला होता. याची दखल घेत बाजार समितीचे सचिव शरद जरे यांनी अनधिकृत व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
बाजार समिती परिसरात अनधिकृत व्यापारी मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये परवानाधारक व्यापारी स्वतःच्या एकाच दुकानात चार ते पाच परप्रांतीयांना गाळे भाडेतत्त्वावर देत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे नियमबाह्य व्यवहारांना चालना मिळत असून बाजार समितीचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, अधिकृत गाळ्यांव्यतिरिक्त फुटपाथवर आणि इतर अनधिकृत ठिकाणी खुलेआम व्यापार सुरू असल्याचेही समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे अनेकदा येतात. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात शरद जरे यांनी अनधिकृत व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
याशिवाय, प्रामाणिक व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी पुढे येत अनधिकृत व्यवहारांविरोधात तक्रारी नोंदवाव्यात आणि उपाय सुचवावेत. तर बाजारातील पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

व्यापारी परवाना रद्द
शरद जरे यांनी अनधिकृत व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. तर प्रशासनाकडून सध्या या प्रकारांची पाहणी आणि पंचनामा सुरु असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदा व्यापारी परवाना रद्द करून पुढील कारवाई केली जाईल, असे देखील प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT