घाटकोपरमध्ये टायगर ग्रुपतर्फे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) : घाटकोपर परिसरात टायगर ग्रुपतर्फे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या सोहळ्यामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
उत्सवानिमित्त श्रीराम मूर्ती पूजन, श्री सत्यनारायण पूजा, संगीत भजन, प्रभू श्रीरामांची महाआरती तसेच महाप्रसाद असे विविध कार्यक्रम श्रद्धेने पार पडले. कार्यक्रमादरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीरामांचे दर्शन घेतले.