मुंबई

मुरबाडमध्ये १२ एप्रिलला भव्य चंदन परिषद

CD

मुरबाड, ता. २८ (वार्ताहर) : तालुक्यातील शेलारी-म्हाडस येथील शांताई निसर्ग पर्यटन केंद्र येथे १२ एप्रिलला भव्य ‘चंदन परिषद’ घेण्यात आली आहे. या परिषदेला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.
चंदन ही किफायतशीर व दीर्घकालीन उत्पन्न देणारी शेती म्हणून ओळखली जाते. ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या शेतीकडे पूरक व्यवसाय म्हणून पाहत आहेत. निसर्गप्रेमी योगेंद्र बांगर यांच्या पुढाकारातून आतापर्यंत पाच चंदन परिषदा पार पडल्या आहेत. त्यातून हजारो चंदन वृक्षांची लागवड यशस्वीपणे करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग खुला होत असल्याचे चित्र आहे.
चंदनाचे झाड लागवडीनंतर सुमारे १२ वर्षांनी उत्पन्न देण्यास सुरुवात करते. चंदनापासून अत्तर, औषधे, सौंदर्यप्रसाधने तसेच विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. बाजारात चंदनाला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांसाठी हा लाभदायक पर्याय ठरत आहे. या परिषदेत चंदन लागवडीसंदर्भातील सर्वांगीण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लागवडीची पद्धत, आवश्यक काळजी, शासकीय नियम, तसेच लागवडीबाबतचे समज-गैरसमज यावर चंदन उत्पादक महासंघाचे संचालक श्रीकांत गोरे (अहिल्यानगर) मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी मर्यादित शेतकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जूनपासून चंदन लागवड करण्याची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिषद विशेष उपयुक्त ठरणार आहे. इच्छुक शेतकरी व चंदनप्रेमींनी सहभागासाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक योगेंद्र बांगर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT