स्वच्छताकर्मींसाठी क्षमता विकास कार्यशाळा
वाशी ता. २८ (बातमीदार)ः कचरामुक्त शहराच्या दिशेने ठोस पाऊल उचलत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छताकर्मींसाठी क्षमता बांधणी व विकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत नगरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी (ता. २५) वाशी येथील महात्मा फुले भवन (सेक्टर ३) तसेच घणसोली येथील समाज मंदिर हॉल (सेक्टर ७) येथे विभागनिहाय ‘क्षमता बांधणी व विकास कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळा ऑरनेट संस्थेच्या सहयोगाने पार पडल्या.
या उपक्रमात संबंधित विभागातील सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक आणि स्वच्छताकर्मी (स्वच्छता दूत) मोठ्या संख्येने सहभागी झाले. वाशी व घणसोली या दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ५४० स्वच्छताकर्मींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे सेवानिवृत्त विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वच्छता व्यवस्थापनातील आधुनिक पद्धती, कचरा वर्गीकरण, तसेच कार्यक्षम सेवा देण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.