वाशीतील श्वान उद्यानाचा कायापालट
श्वानांना आता मुक्तपणे खेळण्याची संधी
तुर्भे, ता २८ (बातमीदार) : वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्वान उद्यानाचा अखेर कायापालट करण्यात आला असून, दुरुस्तीनंतर आता पाळीव श्वानांना सुरक्षित आणि मुक्तपणे खेळता येणार आहे. उद्यानाची दुरवस्था झाल्यामुळे नाराजी व्यक्त करणाऱ्या प्राणीप्रेमींना यामुळे दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून वाशी येथे शहरातील पहिले श्वान उद्यान उभारले होते. मात्र, प्रशासकीय दुर्लक्षामुळे या उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. कुत्र्यांच्या व्यायाम व प्रशिक्षणासाठी बसवलेली उपकरणे गंजून खराब झाली होती, तर लाकडी फळ्या तुटल्याने श्वानांना दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला होता.
या परिस्थितीमुळे मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते हिमांशू पाटील यांनी मनपाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. तसेच वेळेत कार्यवाही न झाल्यास प्राणीप्रेमी व डॉग ओनर्स एकत्र येऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या मागणीची दखल घेत मनपा उद्यान विभागाने तत्काळ उद्यानाची दुरुस्ती केली. यामध्ये उपकरणांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.