मुंबई

वाड्यात गॅस काळाबाजाराचा भंडाफोड;

CD

वाड्यात गॅसच्या काळाबाजाराचा पर्दाफाश
राज्य दक्षता पथकाची धडक कारवाई, दोघे ताब्यात

वाडा, ता. २८ (बातमीदार)ः वाडा तालुक्यात गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास राज्य दक्षता पथक, मुंबई यांनी माहितीच्या आधारे धडक कारवाई करीत हा गैरप्रकार उघड केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून तो अवाजवी दराने विक्री केला जात होता. पाच किलो आणि नऊ किलोच्या सिलिंडरमध्ये तब्बल १५ किलो गॅस भरून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. सरकारकडून अनुदानित दरात मिळणाऱ्या घरगुती गॅसचा गैरवापर करून हा काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत ९१ रिकामे घरगुती गॅस सिलिंडर, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सिलिंडर, तीन इलेक्ट्रिक मोटर्स, वजन काटे तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई मुसारणे येथे एका मालकीच्या जागेत सुरू असलेल्या बेकायदा गॅस व्यवसायावर करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक चौकशीत देवा शंकर पवार हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभरातील अशा गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून, पालघरमधील ही कारवाई गॅस काळाबाजाराच्या साखळीवर मोठा आघात मानली जात आहे. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवंत चौधरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT