फेरीवाल्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र : महापौर रितू तावडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध महापालिका आणि पोलिसांची धडक कारवाई सुरूच असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते व पदपथांवरील फेरीवाल्यांची पडताळणी केली जात आहे. त्यातच आता पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील ही मोहीम तीव्र करण्यात आली आल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी शनिवारी (ता. २८) दिली.
मुंबईतील स्टॉलधारक, फेरीवाले यांचे ओळखपत्र तपासण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. तपासणीदरम्यान बांगलादेशी नागरिक आढळल्यास किंवा परदेशी नागरिक आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने पालिकेसह पोलिसांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरांतील भांडुप, मुलुंड, घाटकोपर या भागांत फेरीवाल्यांविरोधातील ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महापौर पूर्व उपनगरांत वास्तव्यास असल्याने पूर्व उपनगरांत त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. येथील माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही फेरीवाल्यांच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, महापालिका आणि मुंबई पोलिस संयुक्तपणे ही कारवाई करीत असून, शहर फेरीवाला समितीमार्फत फेरीवाला क्षेत्र निश्चितीची प्रक्रियाही सुरू आहे. दुसरीकडे फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरूच राहील, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.