मुंबई

पनवेलमध्ये वाहतूक पोलिसांसोबत धक्काबुक्की,

CD

पनवेलमध्ये वाहतूक पोलिसांसोबत धक्काबुक्की
मद्यपी चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पनवेल, ता. २८ (वार्ताहर): ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई केल्याचा राग मनात धरुन, एका चालकाने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना पनवेलमधील कोन बिट पोलिस चौकीसमोर घडली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.
नवीन पनवेल वाहतूक शाखेत कार्यरत असलेले संजय जाधव हे बुधवारी (ता. २५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोन बिट पोलिस चौकीसमोर कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी आरोपी चालक शेर बहादूर सोनार याला अडवले होते. यावेळी त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्याची ब्रेथ ॲनलाझरच्या माध्यमातून तपासणी केली असता, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर मोटर वाहन कायद्याच्या कलम १८५ (मद्यपान करुन वाहन चालवणे) नुसार कारवाई केली. या कारवाईचा राग मनात धरुन आरोपीने पोलिस कर्मचारी जाधव आणि त्यांच्या सोबत असलेल्या साक्षीदाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने पोलिसांना धक्काबुक्की करुन त्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच कोन चौकीच्या काचांची तसेच खुर्च्यांची व झाडाच्या कुंड्यांची तोडफोड करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी आरोपी शेर बहादूर सोनार याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT