मुंबई

नवतरुणाईला सूर्यफुलाचे आकर्षण....

CD

पर्यटकांना सूर्यफुलाचे आकर्षण
मुंबई, पुण्यासह गुजरातच्या नागरिकांची कृषी पर्यटनाला भेट

वाणगाव, ता. २९ (बातमीदार) : वाणगाव येथील कृषी तंत्र विद्यालय, आसनगावच्या प्रक्षेत्रावर यंदा प्रायोगिकतत्त्वावर आकर्षक सूर्यफुलाची लागवड करण्यात आली आहे. ही सूर्यफुलांची शेती मुंबई, पुण्यासह गुजरातच्या पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून शेती तंत्रज्ञान, फलोत्पादन आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पिकांचे अद्ययावत तंत्रज्ञान दिले जात असल्याची माहिती कृषी प्रतिष्ठानचे सचिव विलास राऊन यांनी दिली.
वसई, विरारपासून ते अगदी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने तरुण-तरुणी, महिलावर्ग रील्स बनविण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आसनगावच्या कृषी नगरीत येत आहेत.
सूर्यफूल लागवड प्रक्षेत्रावर ठरावीक ठिकाणी मधमाशी पेट्यादेखील बसवण्यात आल्या आहेत. सूर्यफुलाकडे मधमाश्‍या मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. मधमाश्यांद्वारे सर्वात जास्त परागीभवन होते. सूर्यफूल लागवडीमुळे मधमाश्‍या परागीभवन घडवून आणतात. त्यामुळे मधाचेही उत्पन्न वाढते आणि सूर्यफुलाच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. पर्यटकांचे सूर्यफूल शेतीला विशेष आकर्षण असल्यामुळे उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण होण्यास मदत झाली आहे. सूर्यफूल लागवडीमुळे सूर्यफुलाचे विशेष आकर्षण आहेच, परंतु शुद्ध खाद्यतेल, उत्पादन, पेंड आणि मधमाश्‍यांना आकर्षित करणारे पीक असल्याने मधाचेही उत्पन्न आणि वर्षभर घरगुती तेलाची गरज भागवता येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने सूर्यफुलाची लागवड करून आर्थिक घडी बळकट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT