मुंबई

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत राजिपचे विद्यार्थी चमकले

CD

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत राजिपचे विद्यार्थी चमकले
जि.प. शाळांतील ३४ विद्यार्थी पात्र
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश परीक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या ८० जागांसाठी जिल्हा परिषद शाळांचे एकूण ३४ विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राजिपचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षेतील यशाचा टक्का वाढावा, या उद्देशाने राजिप शिक्षण विभागाकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. यासोबतच शाळास्तरावरही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळेच जिल्हा परिषद शाळांतील ३४ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेशपात्र ठरले आहेत.
तालुकानिहाय अलिबाग २, उरण १, पनवेल ३, कर्जत ४, खालापूर २, पेण १, सुधागड २, रोहा ३, माणगाव १, महाड १, पोलादपूर ६, म्हसळा १, श्रीवर्धन १, मुरूड २, तळा ४ अशा एकूण ३४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

चौकट:
निवड झालेले विद्यार्थी
अर्वा चिखले, धैर्य नफे, वेदांत पाटील, सौरभ घुले, आयशा झा, इश्वरी भांगे, सोहम जाधव, आयुष जोगदंडे, ओम हरपुडे, साई भोईर, मानस चव्हाण, कुशल नारले, आरव पाटील, स्वरा जेवे, अक्ष करंजकर, कार्तिकी शिंदे, आरूष शिंदे, श्लोक मढवी, अक्षरा सुर्यवंशी, अभिजित शिंदे, दिपश्री बिरादार, मधुरा कोलवडकर, प्रतिक चिकणे, अभिनव एकशिंगे, अस्मिता मोरे, जितरत्न गायकवाड, आदित्य गिरीगोसावी, अनुश्री केरलकर, क्षितीज म्हात्रे, आराध्या लाड, आरूषी बोडखे, प्रार्थना ठमके, मंथन पत्रे, मानवी पवार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT