मुंबई

डहाणू–चारोटी राज्य मार्गाचे ठप्प काम लवकरच मार्गी

CD

राज्य मार्गाच्या कामाला गती
डहाणू-चारोटीदरम्यान वृक्षतोडीला सुरुवात

कासा, ता. २९ (बातमीदार) ः डहाणू- जव्हार- मोखाडा- त्र्यंबकेश्वर राज्य मार्गाचे नूतनीकरण सुरू आहे; पण डहाणू-चारोटीदरम्यान वृक्षतोडीच्या कामाला परवानगीअभावी अनेक दिवसांपासून काम बंद होते. अखेर दोन दिवसांपासून झाडे तोडण्याचे काम सुरू झाल्याने कामाला गती आली आहे.
पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मार्गाच्या रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरणासाठी २५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याअंतर्गत चंद्रसागर ते सरावलीदरम्यान ३० मीटर रुंदीचे चौपदरीकरण, तर सरावली ते चारोटीदरम्यान १३ मीटर रुंदीचा काँक्रीटचा रस्ता होणार आहे. तसेच ५३ नवीन मोऱ्या, ११ लहान पूल, चंद्रसागर, सरोवर हॉटेल परिसरात चार मोठे पूल उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी डहाणू वनविभागातील ९७४, कासा वनपरिक्षेत्रातील ७७०, डहाणू नगर परिषद क्षेत्रातील ७७६ अशा २,५०० झाडांची तोड करण्यात येणार आहे; पण परवानगीअभावी काम दीर्घकाळ रखडले होते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहनचालकांना पर्यायी कच्च्या मार्गाचा वापर करावा लागत आहे.
-----------------------------------------
धुळीचे लोट
- रात्री अपुरी प्रकाशयोजना असल्याने अपघातांचा धोका आहे. दोन दिवसांवर महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू होत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे ठेकेदाराने आवश्यक सूचनाफलक लावण्याची मागणी होत आहे.
- दोन ते अडीच महिन्यांत पावसाळा सुरू होणार असल्याने काम वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. मार्गावर मोठे खड्डे पडल्याने दिवसभर धुळीचे लोट उडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.
-----------------------
डहाणू-चारोटी राज्य मार्गाचे रुंदीकरणाचे काम जवळपास बंदच आहे. अनेक ठिकाणी अर्धवट खोदकामामुळे विविध अडचणी उद्भवतात.
- राजकुमार गिरी, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT