मुंबई

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात रोटरी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

CD

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन

पालघर (बातमीदार) : पालघर परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन करावे, याकरिता दांडेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि रोटरी क्लब पालघर यांच्या पुढाकाराने जवळपास ७० लाख रकमेचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून, केंद्रामार्फत विविध क्षेत्रांशी संबंधित असलेल्या स्पर्धा परीक्षांची माहिती आणि त्यांचा अभ्यास कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देणे हे सामाजिक संस्थांचे आद्य कर्तव्य आहे. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने आतापर्यंत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र हे एक रोपटं आहे. त्याचे जतन, संवर्धन सोनोपंत दांडेकर संस्थेने करावे, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता यांनी केले.
पालघर रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय महाजन यांनी आपल्या स्वप्नातील उपक्रम प्रत्यक्षात येण्याचा आनंद व्यक्त केला. या उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दोन्ही क्लबचे आभार मानत रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. रोटरियन भगवान पाटील यांनी रोटरी क्लबच्या जागतिक स्तरावरच्या कामाचा परिचय उपस्थितांना करून दिला. अध्यक्षीय समारोपात सीए सचिन कोरे यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. शिक्षणासाठी लागणाऱ्या उणिवा भरून काढण्यासाठी केलेली आर्थिक मदत जराही वाया जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT