मुंबई

पोहण्याचा मोह जीवावर

CD

पोहण्याचा मोह जीवावर
जीआयपी धरणामध्ये बुडून एकाचा मृत्यू

अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) ः पूर्वेतील जीआयपी धरणामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या एकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी पोहण्याचा मोह टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वाढत्या उष्णतेमुळे शंकर थापा (३५) अंघोळीसाठी शनिवारी (ता. २८) धरणामध्ये उतरला होता; मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून मृतदेह शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला आहे.
----------------------------
सुरक्षेचा अभाव
काकोळे गावाजवळील मध्य रेल्वेच्या मालकीचा जीआयपी तलाव पुन्हा चर्चेत आला आहे. या तलावाभोवती सुरक्षित कुंपण नसल्याने दरवर्षी अशा घटना घडत आहेत. त्यामुळे तलावाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT