जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी भोईर यांच्याकडून शाळांची पाहणी
पेण, ता. २९ (वार्ताहर) : पेणच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याच्या निर्धाराने रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या पल्लवी भोईर यांनी अचानकपणे जिल्ग्रामहा परिषदेच्या चोळे, शिहू, बेणसे तसेच मुंढाणी येथील शाळांना भेट देत शाळांसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांची सखोल तपासणी केली.
ग्रामीण भागातील शाळा स्मार्ट व्हाव्यात, यासाठी सरकारने काही उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यामध्ये डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल लर्निंग सेटअप, ई-लर्निंग कंटेंटसह स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर यांचा समावेश असणार आहे.
शाळांमध्ये मिनी ग्रंथालय उभारून ‘एक विद्यार्थी एक पुस्तक’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच स्किल-बेस्ड शिक्षणावर भर देत संगणक ज्ञान, बेसिक टेक्नॉलॉजी आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग, करिअर मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षा तयारीची प्राथमिक ओळख करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे. याशिवाय शाळांमध्ये स्वच्छ, हरित आणि तंत्रज्ञानयुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संबंधितांनी शाळेतील भौतिक सुविधा, शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती संजय भोईर, माजी सरपंच विश्वास मोकल भास्कर म्हात्रे, माजी उपसरपंच घनश्याम कुथे, सुजित गदमळे, दिपक पाटील, प्रविण कुथे, चंद्रकांत म्हात्रे, हेमंत मोकल, नरेश म्हात्रे आदींसह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.