मुंबई

कोनगावात नारळपाणी विक्रेत्यावर हल्ला

CD

वज्रेश्वरी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गावदेवी मंदिराजवळ एका नारळपाणी विक्रेत्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलच्या वापराबाबत झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारळपाणी विक्रेता हुसेन आताउर शेख (वय २२, रा. कल्याण) याच्या तक्रारीनुसार ही घटना शुक्रवारी (ता. २७) दुपारी १२ च्या सुमारास घडली. सायकलवर नारळ ठेवून विक्री करत उभा असताना भावेश (रा. कोनगाव, भिवंडी) तेथे आला. त्याने शेखकडून कॉल करण्यासाठी मोबाईल घेतला. बोलून झाल्यानंतर त्याने कॉल हिस्ट्री डिलीट करून निघून गेला. पुढील दिवशी भावेश पुन्हा घटनास्थळी येऊन शेखला शिवीगाळ केली. मी तुझ्या मोबाईलवरून काल कॉल केला होता, त्यावर तू मेसेज का केला? असा जाब विचारू लागला. यावर फिर्यादीने कोणताही संदेश पाठवलेला नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या भावेशने त्याच्या कारच्या डिकीतून लाकडी दांडका काढून फिर्यादीला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेखला गंभीर दुखापत झाली. तसेच, तू इथे नारळपाणी कसे विकतोस ते पाहतो, अशी धमकी देत दहशत निर्माण केली. जखमी अवस्थेत शेखने कोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून भावेश सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: आर अश्विन-वीरेंद्र सेहवाग यांच्यात ऑन एअर भांडण; BCCI करणार दोघांवर कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण

Success Story: मुंबईत १५ वर्षे नोकरी केली, शेवटी गाव गाठत सुरू केला व्यवसाय; उभारली मसाले-सरबतची यशस्वी दुनिया!

Compensation Rule: महाराष्ट्रात अतिवृष्टी मदतीत मोठा बदल! सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार; ‘मर्यादा’ पूर्णपणे रद्द

"न रडता तिने स्वतःसाठी नवा मार्ग शोधला" सिद्धार्थने केलं बायकोचं कौतुक; बायकोच्या नव्या करिअरविषयी म्हणाला..

Pimpri News: पाणीगळतीने ‘ग्रेडसेपरेटर’ धोकादायक; सात वर्षांपासून कारण सापडेना; तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा महापालिकेवर आरोप

SCROLL FOR NEXT