मुंबई

मराठा समाज खारघर आणि प्रगती महिला मंडळा कडून खरात यांच्या विरोधात जाहीर निषेध, आंदोलन

CD

अशोक खरातला कठोर शिक्षा करा
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची गांधी चौकात निदर्शने
उरण, ता. २९ (बातमीदार) : अशोक खरात या भोंदूबाबाचे नवनवीन कारनामे उघडकीस येत आहेत आणि ते अस्वस्थ करणारे आहेत. अशोक खरातला कठोर शिक्षा करा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे. संघटनेकडून रविवारी (ता. २९) महात्मा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
खरात प्रकरणात आरोपींना वाचविण्याचे अथवा दिरंगाई करण्याचे प्रयत्न आढळून आले, तर महिला संघटना सर्व समविचारी शक्तींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशारा संघटनेने दिला आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलाणी यांना निवेदन दिले.
या वेळी राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, धनवंती भगत, सविता पाटील, लता पाटील, उषा म्हात्रे, कुसुम ठाकूर, शारदा ठाकूर, कुंदा पाटील, प्रणाली पाटील, गुलाब टावरी, मुमताज भाटिया, निरा घरत, उरण पंचायत समिती सदस्य कविता म्हात्रे, ललिता पाटील, रजनी पाटील, अपर्णा म्हात्रे यांच्यासह कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड संजय ठाकूर, कॉम्रेड संतोष ठाकूर, किसान सभेचे पद्माकर पाटील आणि इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT