तळोजा भुयारी मार्गात वाहनांच्या लांबच लांब रांगा
खारघर, ता. २९ (बातमीदार) : तळोजा येथील शीघ्र कृती दलसमोरील सिग्नलवर वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला आहे. यामुळे तळोजा भुयारी मार्गात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या सिग्नलवर तातडीने कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी तळोजावासीयांकडून केली जात आहे.
शीघ्र कृती दल सिग्नल हा तळोजा, खारघर आणि पनवेलला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. सिडकोकडून तळोजा-खारघर खाडी पुलाचे काम सुरु असल्यामुळे तळोजा वसाहतीमधून बाहेर पाडण्यासाठी भुयारी मार्ग हा एकमेव रस्ता आहे. या मार्गावरुन प्रवास करताना काही वाहन चालक सिग्नलकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अनेकदा येथे वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. काही वाहनचालक स्वतःहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही.
उपाययोजनांची मागणी
स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार नोंदवत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या सिग्नलवर नियमितपणे वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. तळोजा-खारघर-पनवेलकडे जाताना सिग्नल यंत्रणेची वेळ वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.