मुंबई

आरसीएफ कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण

CD

आरसीएफ कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)तर्फे निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत थळ युनिट परिसरातील जवळच्या गावांतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
आरसीएफ वसाहत येथे आयोजित विशेष समारंभात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, वरिष्ठ अधिकारी, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. यावेळी बोलताना कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांनी, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. आरसीएफ आपल्या सीएसआर उपक्रमांद्वारे समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले.
या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT