भगवान महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : भगवान महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. ३१) महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. लायन्स क्लब अलिबाग व कच्छी भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे शिबिर अलिबाग शहरातील श्रीबाग रोड येथील कच्छी जैन भवन येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे.
या रक्तदान शिबिरासाठी प्रशांत नाईक मित्रमंडळ, लायन्स क्लब अलिबाग डायमंड, अलिबाग-रेवस मिनीडोर संघटना, अलिबाग ऑटो रिक्षा संघटना, आगरी समाज संस्था अलिबाग, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान तसेच मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, अलिबाग यांचे सहकार्य लाभले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.