पडघा (बातमीदार) : मनसेप्रणीत श्री छत्रपती वाहतूक संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन पडघा येथे उत्साहात पार पडले. भिवंडी व शहापूर तालुक्यातील वाहनचालकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. नामफलकाचे उद्घाटन मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, उपजिल्हाध्यक्ष दिलीप भोपतराव, राकेश वारघडे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संदीप हरड, भिवंडी तालुकाध्यक्ष विकास जाधव, शहापूर शहराध्यक्ष विनोद पाठारी, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी; तसेच विभाग अध्यक्ष प्रताप विशे उपस्थित होते. कार्यक्रम टोलनाका पडघा येथे झाला. वेळप्रसंगी सरकारी यंत्रणा उपयोगी पडत नाही; मात्र वाहनचालकांच्या गाड्या समाजासाठी धावून येतात. त्यामुळे सरकारने वाहनचालकांना अनावश्यक त्रास देऊ नये. कोणी त्रास दिल्यास वाहतूक संघटना त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष संदेश वारघडे, रूपेश पाटोळे, सचिव अनिल देशमुख, कार्याध्यक्ष संदीप पाटील, सहसचिव अरुण चंदे, खजिनदार दिनेश भोईर; तसेच शेकडो मनसे कार्यकर्ते व वाहनचालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.