गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका
नेरूळ, ता.२९(बातमीदार) : महापालिकेकडून नेरूळ आणि सानपाडा नॉडला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी या रस्त्यावरील चौक, शाळा परिसरातील हटवलेले गतिरोधक नव्याने बसवलेले नाहीत. यामुळे वाहनांचा वेग वाढला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नेरूळ आणि सानपाडा नॉडला जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. नेहरू सेक्टर दोन मधील राजीव गांधी उड्डाण पुलापासून सानपाडा कारखेडला जाणाऱ्या रेल्वे रुळापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले होते. विविध चौक, सोसायत्या, शाळा आदींजवळ यापूर्वी गतिरोधक होते. यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात होता. आणि विद्यार्थी, नागरिकांना रस्ता ओलांडणे देखील सोयीचे होते. परंतु डांबरीकरणाचे काम सुरू करताना गतिरोधक हटविण्यात आले होते. ते गतिरोधक पुन्हा बसवण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.