मुंबई

जलधारण तलावातील गाळ न काढल्यास धोका

CD

जलधारण तलावातील गाळ न काढल्यास धोका
नेरूळ, ता.२९ (बातमीदार): शहराचे संरक्षक कवच असणाऱ्या जलधारण तलावात (होल्डिंग पॉन्ड ) वाढलेल्या खारफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. पावसाळ्यात धोका टाळण्यासाठी सीबीडी बेलापूर सेक्टर ११ मधील जलधरण तलावातील गाळ काढण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय समितीचे सभापती डॉ. जयाजीनाथ यांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.
मुसळधार पावसात भरतीचे पाणी शहरात सुरू नये यासाठी सिडकोने शहरातील खाडी किनाऱ्याजवळ जलधारण तलाव तयार केले आहेत. या तलावाच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले असून, भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी या तलावात जमा होईल, अशा पद्धतीने या दरवाजांची रचना करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून या तलावात मोठ्या प्रमाणावर खारफुटीची वाढ झाली असून, गाळदेखील मोठ्या प्रमाणावर साचला आहे. त्यामुळे शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यास जास्त कालावधी लागत असून शहरातील काही भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील वर्षी देखील जलधारण तलावातील गाळ वेळेवर न काढल्याने मे महिन्यात अचानक झालेल्या पावसात संपूर्ण सीबीडी परिसर जलमय झाला होता.
या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पंप हाऊसची डॉ. जयाजीनाथ यांनी बुधवारी पाहणी केली. पाऊस कधीही पडू शकतो त्या अनुषंगाने कोणतीही समस्या निर्माण होणारी यासाठी संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना डॉ. नाथ यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या ठिकाणी प्रत्यक्षात किमान चार मोटारींची आवश्यकता असताना सद्यस्थितीत एकच मोटर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT