मुंबई

नेरूळ सेक्टर १६-ए मधील पदपथ धोकादायक

CD

नेरूळ सेक्टर १६-ए मधील पदपथ धोकादायक
नेरूळ, ता.२९ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १६-ए परिसरातील पदपथाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना येथून चालताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पदपथावर अनेक ठिकाणी सिमेंटचा मलबा गटारात पडला आहे. काही ठिकाणी पदपथाच्या गटारावरील झाकणांजवळ छिद्रे पडल्याने त्यातून दुर्गंधी पसरत आहे.
त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी गटारावरील झाकणांना मोठे भोक पडल्याने त्यात पाय पडून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शहरातील अनेक ठिकाणी पदपथ दुरुस्तीची गरज आहे मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. या पदपथावरून गेलेल्या काही विद्युत वाहिन्यांसुद्धा अत्यंत धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत. या विद्युत वाहिन्या उघड्या अवस्थेत असून, त्यातून एखाद्याच्या जीवाला धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे नागरिकांचे मत आहे.
या साऱ्या समस्यांची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने या पदपथाची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, तसेच गटारात पडलेला मलबा त्वरीत हटवावा आणि विद्युत वाहिन्या सुरक्षित कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT