पनवेल महापालिका क्षेत्रात नालेसफाई करण्याची मागणी
नगरसेवक रामदास शेवाळे यांचे महापौर, आयुक्तांना पत्र
पनवेल, ता. २९ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रात अद्याप नालेसफाईची कामे सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मॉन्सूनपूर्व काळातच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत नाले तुंबण्याची आणि पाणी साचण्याची समस्या उद्भवत आहे. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळित होत असून, नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक रामदास शेवाळे यांनी पालिका आयुक्त व महापौरांना पत्र देत नालेसफाई तातडीने करण्याची मागणी केली आहे.
नाले तुंबल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. तसेच दूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. पनवेल पालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे वेळेत सुरू न झाल्यास नागरिकांना पुन्हा एकदा पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. विशेषतः कळंबोलीतील परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलून नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाईची कामे हाती घ्यावीत, असा आग्रही मागणी नगरसेवक रामदास शेवाळे यांनी केली आहे.
दरम्यान, शेवाळे यांनी प्रशासनाला नालेसफाईच्या कामांवर नियमित देखरेख ठेवण्याचे तसेच कामांची गुणवत्ता व वेळेचे नियोजन काटेकोरपणे पाळण्याच्या सूचनाही देण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोट
पनवेल महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे वेळेत आणि प्रभावीपणे न झाल्यास पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. विशेषतः कळंबोली परिसरातील परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलून नालेसफाईची कामे नियोजनबद्ध व पूर्ण क्षमतेने राबवावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे प्राधान्याने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
- रामदास शेवाळे, नगरसेवक, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.