मुंबई

गायमुख घाटावर मनस्ताप

CD

गायमुख घाटावर प्रवास त्रासदायक
दुरुस्तीच्या कामांमुळे आठवड्याभरापासून कोंडी

ठाणे शहर, ता. २९ (बातमीदार) ः घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट वाहतुकीचा मुख्य दुवा आहे; मात्र तीव्र उतार, चुकीच्या वळणांमुळे हा मार्ग नेहमीच कोंडीला निमित्त राहिला आहे. अशात आठवड्याभरापासून पुन्हा सुरू असलेल्या दुरस्तीच्या कामांमुळे रोजचा प्रवास त्रासदायक झाला आहे.
घोडबंदर मार्गावर रोज हजारो जड-अवजड वाहनांची उरण-गुजरात अशी वाहतूक होते. मल्टी एक्सल ट्रक, टँकर, कंटेनरमधून माल गुजरात, पालघर भागात जातो. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा गायमुख घाट दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे; मात्र असे असताना घाटाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील हा घाट दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीच्या कोंडीत सापडला आहे. आठवड्याभरापासून घाटातील ठाणे-भाईंदर मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असून जड-अवजड वाहनांमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
-----------------------------
प्रमुख अडथळे
- भाईंदर-ठाणे मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी संरक्षक खांब उभे केले जाणार आहेत. या कामामुळे उतारावरून येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या कडेला खोदकामामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. कासारवडवली सिग्नल येथे सेवा रस्ता खोदण्यात आला आहे.
- नागला बंदर येथेही ठाणे वाहिनीच्या काँक्रीटीकरणामुळे कोंडी होत आहे. विद्यापीठ परिसरात सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीन केला असला तरी या ठिकाणी घोडबंदर मार्गाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा वॉल्व्ह रस्त्याच्या मध्यभागी आला असल्याने कोंडी होत आहे.
---------------------------
गायमुख घाटाच्या सततच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होतो. नागरिकांच्या पैशांचा चुराडा करूनही घोडबंदरकरांच्या नशिबी मात्र मनस्तापच आहे.
- नरेश मणेरा, मा. उप-महापौर, ठाणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT