मुंबई

आज पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा

CD

आज पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा
आरोग्य, बेघर निवारा केंद्रासह ११ विषयांवर होणार चर्चा
वसई, ता. २९ (बातमीदार)ः वसई-विरार शहरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी ( ता.३०) दुपारी ३ वाजता मुख्यालयात होणार आहे. या सभेत बेघरांसाठीचा नवीन निवारा केंद्र, आरोग्य, नाट्यगृह तसेच शहरातील विकास कामांचे अकरा विषय मांडण्यात येणार आहेत.
वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील वसई पूर्व वालीय येथे शहरी बेघरांसाठी नवीन रात्र निवारा केंद्र इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या खर्चासाठीची प्रशासकीय तसेच वित्तीय मान्यता देऊन ई-निविदा कार्यप्रणाली दर मागवण्यासाठीचा विषय सादर होणार आहे. तसेच महापालिकेच्या ६ महिने कंत्राटी तत्वावर कार्यरत वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याचबरोबर वसई पूर्वेतील सातिवली पायधुनी येथील महेश इंडस्ट्री जवळ आरोग्य केंद्र उभारणे, वसई पूर्व-पश्चिम भागात पदपथ तयार करणे, गटार बांधणे, कुंभारपाडा नाका ते खंदरपाडा रोड पर्यंत रस्ता रुंदीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
-------------------
सत्ताधारी-विरोधक आक्रमक
गेल्या महासभेत सत्ताधारी बहुजन विकास आघाडी, भाजप आमनेसामने आले होते. त्यामुळे काहीकाळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण महापौर अजीव पाटील यांनी वेळीच हस्तक्षेप केला होता. त्यामुळे आज होणारी सर्वसाधारण सभापण अशाच प्रकारे गाजण्याची शक्यता आहे.

यथा राजा, तथा प्रजा! खरात प्रकरणी सुषमा अंधारे मुख्यमंत्री फडणवीसांवर घसरल्या, शपथविधीला...

Parli Thermal Record: परळी औष्णिक केंद्राचा विक्रम: बॉयलर ट्यूब लीक न होता संच क्रमांक ६ चा ४६७ दिवस अखंड वीजपुरवठा

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सचा भारी विक्रम... ठरली जगातील पहिली फ्रँचायझी; पाकिस्तानचा विक्रम आता संकटात

Deglur gutkha crackdown: देगलूरात गुटखा कारवाया केवळ दिखाऊ? लाखोंची वाहनजप्ती, नगण्य साठा; ‘मोठे मासे’ अजूनही मोकाट

Latest Marathi News Live Update : बस आगारात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

SCROLL FOR NEXT